...

Tuesday, January 14, 2014

विठ्ठलाची आरती


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ! 
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा !!
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा ! 
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा !!१!!

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ! 
रखुमाई वल्लभा राईच्या 
वल्लभा पावे जिवलगा !!धृ.!!

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ! 
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं !! 
देव सुरवर नित्य येती भेटी ! 
गरूड हनुमंत पुढे उभे राहती !!२!!

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ! 
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां !!
राई रखुमाबाई राणी या सकळा ! 
ओवाळीती राजा विठोबा सांवळा !!३!!

ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ! 
चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती !!
दर्शन हेळामात्रें तया होय मुक्ती ! 
केशवासी नामदेव भावे ओवाळिती !!५!!
रचना : संत नामदेव 

2 comments: