...

Monday, January 13, 2014

ऐसे गुंफेमध्ये नाही नामदेव

वारकरी चळवळीचे दोन उत्तम संघटक म्हणजे नामदेव आणि निवृत्तीनाथ. या दोन समकालीन संतांमधला भावबंध कायम दुर्लक्षितच राहिला. सांगत आहेत, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. नि. ना. रेळेकर 

वारकरी चळवळीचे दोन उत्तम संघटक म्हणजे नामदेव आणि निवृत्तीनाथ. या दोन   समकालीन संतांमधला भावबंध कायम दुर्लक्षितच राहिला. श्रीनिवृत्तीनाथमहाराज आणि श्रीनामदेवमहाराज यांच्या ऋणानुबंधाकडे, आजवर, संतवाङ्मयाचे संशोधक, समीक्षक, अभ्यासक आणि उपासक यांचे जावे तेवढे लक्ष गेले नाही. श्रीविठ्ठलाच्या संतप्रभावळीत संत निवृत्तीनाथ काहीसे उपेक्षितच राहिले आहेत. तसेच त्यांचे नामदेवकुटुंबीयांशी असलेले भावसंबंधही दुर्लक्षिले गेले आहेत.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या एकूण उपलब्ध अभंगांत, केवळ दोन ठिकाणीच संत नामदेवांचा नामनिर्देश आहे. सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या उपलब्ध अभंगांतही नामदेवांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एकदाही नामोच्चार नाही. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथांनी ‘पंढरीच्या काल्या’वर बारा अभंग लिहून त्यांमध्ये नामदेवांचा, त्यांची आई साध्वी गोणाईंचा आणि नामदेवसुपुत्र संत विठा (विठ्ठल) आणि संत नारा (नारायण) यांचा भक्तिप्रेमाने उल्लेख केला आहे, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नामदेवांनी अभंगकीर्तनाचे असामान्य योगदान ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाला दिले, त्याप्रमाणेच चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वप्रथम ‘गोपाळ-काला’ करून या संप्रदायाला ‘काल्या’चे व्यवच्छेदक लक्षणही प्राप्त करून दिले. वारकरी काल्यात नेहमी म्हणण्यात येणाऱ्या.......

No comments:

Post a Comment